‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार

All We Imagine As Light OTT Release Update | ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा भारतीय चित्रपट जगभरात चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडियाने केले आहे. अनेक अवॉर्ड्स या चित्रपटाने मिळवले आहेत. आता हा चित्रपट अखेर प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमाच्या ओटीटी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील दोन मल्याळी परिचारिकांच्या एकमेकांशी जोडलेल्या आयुष्याची कथा यात सांगण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडियाने केले आहे. All We Imagine As Light OTT Release Update |
View this post on Instagram
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचा ओटीटी प्रिमियर जानेवारीमध्ये डिस्ने+हॉटस्टारवर होणार आहे. शुक्रवारी, डिस्ने+ हॉटस्टारच्या अधिकृत हँडलवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट ३ जानेवारीपासून प्रसारित होईल. फेस्टिव्हल डी कान ग्रां पी विजेता 2024 आणि 2 गोल्डन ग्लोब नॉमिनेशन मिळवणारा, पायल कपाडियाची उत्कृष्ट कलाकृती असलेला ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ३ जानेवारीला डिस्ने+ हॉटस्टारवर रिलीज होईल,” असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान,पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ला दोन गोल्डन ग्लोब नामांकने मिळाली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर – नॉन-इंग्रजी भाषेसाठी नामांकन मिळाले होते आणि चित्रपट निर्मात्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीही नामांकन मिळाले होते.
पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या कान २०२४ चित्रपट सोहळ्यात ‘ग्रां पी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शिका पायल कपाडिया ठरली. कनी कुश्रुती, दिव्या प्रभा, छाया कदम, हृधू आरोन आणि अझीस नेदुमनगड यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आहे.
हेही वाचा:
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित ; ‘या’ दिवशी होणार घोषणा ?





