‘AI’चा करिष्मा.! राज्यातील ‘या’ नेत्यांचा भन्नाट अवतार पाहिले का? फोटो झाले तुफान व्हायरल !

मुंबई – सध्या जगात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स झाल्याचे आपण पाहतो.
भविष्यामध्ये येणारे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर करून भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्र हे विकसित होऊ शकते. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील.
अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार!
पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे.In the world of Artificial Intelligence let’s… pic.twitter.com/QlcczRuVWr
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 27, 2023
आता यामध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांच्या एआय फोटोंची भर पडली आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असून, नेटकरी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर. आर. पाटील राजीव सातव, गिरीश बापट, विनायक मेटे, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस नेते डिस्ने कार्टुन स्टाईलमधे…
AI Art by Me 😀 #midjourney #AIArtworks
Part 1 pic.twitter.com/ynT65jVuiW— Amit Wankhade (@Amit_I_Patil) June 26, 2023
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी हे फोटो आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवर देखील शेअर केले असून, अमित वानखेडे यांचे आभार मानले आहेत. अमित वानखेडे यांनी हे फोटो बनवले आहेत. आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या नेत्यांचे हे बनवले आहेत.





