हिंगणघाट प्रकरणातील आरोपीच्या विरोधात चार्जशीट दाखल- गृहमंत्री
Updated On:

मुंबई: हिंगणघाट येथील जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
आज न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळण्याच्या दृष्टीने सरकार पाठपुरावा करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.





