Char Dham Yatra : थांबा.! अधिक भाविकांना यमुनोत्रीला पाठवणे धोक्याचे; पोलिसांनी दिला इशारा

Yamunotri | police – सध्या सुरू झालेल्या चार धाम यात्रेसाठी पुरेसे भाविक यमुनेत्रीला पोहचले आहेत, त्यामुळे यापुढे या ठिकाणी अधिक भाविक पाठवणे धोकादायक होऊ शकते असा इशारा उत्तरकाशी पोलिसांनी दिला आहे. थोडी वाट पाहून आधीच्या भाविकांचा गर्दीचा भर ओसरल्यावर इकडे भाविक सोडले जावेत अशी सुचना त्यांनी केली आहे.
उत्तरकाशी पोलिसांनी ट्विट केले की, “आज, पुरेशा संख्येने भाविक त्यांच्या क्षमतेनुसार श्री यमुनोत्री धाममध्ये पोहोचले आहेत. आता अधिक भाविकांना पाठवणे धोक्याचे आहे.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आज यमुनोत्रीला जाणाऱ्या सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी त्यांची आजची यमुनोत्री यात्रा पुढे ढकलावी. दुसऱ्या ट्विटमध्ये, उत्तरकाशी पोलिसांनी यमुनोत्री धाम मार्गावरील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.
यात्रेकरूंच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी, अरुंद आणि संवेदनशील मार्गांवर वाहतूक/प्रवास गेट/एकमार्गी प्रणालीद्वारेसुनियोजितता आणण्यात येत आहे. दरम्यान, चार धाम यात्रेच्या पहिल्या दिवशी २९००० हून अधिक भाविकांनी केदारनाथ धाम येथे नमन केले.
चार धाम यात्रेला उत्तराखंडमध्ये १० मे रोजी सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह तिन्ही धाम गजबजली आहेत.





