Pimpri: संविधान सन्मान दौडनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
आज पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत वाहतुकीत बदल

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रथमच गुरुवारी (दि. २६) संविधान दिनानिमित्त ‘संविधान सन्मान दौड’ आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी ७ वाजता चिंचवड येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक येथून या दौडीला प्रारंभ होणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथील भीमसृष्टी येथे दौडीचा समारोप होणार आहे.
संविधानाचा करू सन्मान, पिंपरी-चिंचवड शहर माझा अभिमान हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या दौडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
दौड सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी तसेच सहभागी नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत गुरुवारी पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. याकाळात शहरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार असून या रस्त्यांऐवजी वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वाहतूक बंद असणारे मार्ग आणि पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
- ॲटो क्लस्टर ते हनुमान मंदिर चौक
- ॲटो क्लस्टर येथून हनुमान मंदिर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांना मदर तेरेसा पूल,
- काळेवाडी, ॲटो क्लस्टर मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
- सम्राट चौक ते मोरवाडी चौक
- अहिल्यादेवी चौक येथून सम्राट चौक ते मोरवाडी चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांना
- सम्राट चौक युटर्न, जुने कोर्ट मार्गे किंवा अजमेरा मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
- नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे येणारी वाहतूक
- आंबेडकर चौक येथे नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांना
- महात्मा फुले स्मारकापासून डाव्या बाजूने आलम गॅरेज मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
- चिंचवडकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक
- चिंचवडकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांना लोकमान्य हॉस्पिटलपासून
- डाव्या बाजूने इच्छितस्थळी जाता येईल.
- बसवेश्वर चौकाकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक
- बसवेश्वर चौकाकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. केएसबी चौकाकडून येणाऱ्या
- वाहनचालकांना बसवेश्वर चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
BJP: शहराच्या विद्रूपीकरणात भाजप पदाधिकारी अव्वल





