पुणे | अंगारकी निमीत्त वाहतूकीत बदल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आज (मंगळवार) अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजीरोडवरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी संबंधीत ऱस्त्यावरील वाहतुकीवर काही निर्बंध टाकले आहेत.
पी.एम.पी.एम.एल. च्या बसेस, चारचाकी व जड वाहने यांना शिवाजी रोडवर येण्यास मंगळवारी गर्दी संपेपर्यंत बंदी करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास चारचाकी व दुचाकी वाहनांवर लाल महाल चौकापासुन पुढे निर्बंध घातले जातील. वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेनुसार खालील स्वरुपात वाहतुकीचे डायव्हर्शन करणे बाबत आदेश देण्यात आले आहेत.
हे आहेत पर्यायी मार्ग…
१) पुरम चौकातून बाजीराव रोडवरुन शिवाजीनगर कडे जाणा-या वाहन चालकांनी पुरम चौकातुन टिळक रोडने – अलका टॉकीज चौक व पुढे एफ सी रोडने इच्छितस्थळी जावे.
२) शिवाजीरोड वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौकटिळक चौक टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.
३) स.गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
४) अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित्तस्थळी जावे.





