अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल

पुणे- राज्यात इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश करण्यात येणार आहेत. यात विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी 16 ऑगस्टपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 9 ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध होणार होती मात्र आता तारखेत बदल करण्यात आला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशाबाबतची व उपलब्ध जागांची माहिती संकेतस्थळावर भरण्यासाठी 1 ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध झाली आहे. महाविद्यालयांनी भरलेल्या माहितीची विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून तपासणीचे कामही सुरू आहे. मात्र, आजूनही बहुसंख्य महाविद्यालयांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आता विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जाचा भाग-1 आणि शुल्क भरून अर्ज लॉक करावा लागणार आहे. अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेण्यासाठी शाळा, मार्गदर्शन केंद्र निवडणे व त्यानुसार अर्ज पडताळणी झाली आहे की नाही याची खात्रीही करावी लागणार आहे. माध्यमिक शाळा व मार्गदर्शन केंद्रांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात भरलेली माहिती ऑनलाइन तपासून ती प्रमाणित करावी लागणार आहे. अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी नंतर वेळापत्रक जाहीर होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंत सुविधा सुरू राहणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
विभागनिहाय कनिष्ठ महाविद्यालय व प्रवेश क्षमता
विभागमहाविद्यालय संख्याप्रवेश क्षमता
मुंबई830314770
पुणे22670430
नागपूर21659250
नाशिक6025270
अमरावती195450
एकूण1351475170





