काऊंटडाऊन सुरु! ‘बिग बॉस’१९ची पहिली झलक समोर, लोगो बदलला

Bigg Boss 19 | ‘बिग बॉस’ हा सर्वात लोकप्रिय शो आहे. चाहते देखील या शोच्या आगामी पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचदरम्यान, आता शोच्या निर्मात्यांनी सीझन १९ चा पहिला लूक रिलीज केला आहे. विशेष म्हणजे यावेळी शोचा आयकॉनिक ‘आय’ लोगो बदलण्यात आला आहे.
नवा लोगो बोल्ड आणि रंगीबेरंगी डिझाईनमध्ये समोर आला आहे. नव्या डिझाईनमधून आगामी सीझनमधील नाट्य, ट्विस्ट आणि उत्साहाची झलक दिसते. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 19’मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) महत्त्वाचा भाग असणार आहे. शोच्या फॉरमॅटमध्येही मोठा बदल झालेला दिसणार आहे. शोचा प्रीमियर ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. Bigg Boss 19 |
जिओ हॉटस्टारने ‘बिग बॉस 19’चा पहिला लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो पाहून चाहते उत्सुक आहेत. लूक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘काउंटडाउन सुरू झाले आहे, लवकरच अनलॉक होईल.’ Bigg Boss 19 |
View this post on Instagram
;
यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. ‘बिग बॉस ताजा खबर’ या फॅन पेजनुसार, यावेळी रती पांडे, धनश्री वर्मा, श्रीराम चंद्र, हुनर अली, अपूर्वा मुखिजा, तनुश्री दत्ता, शरद मल्होत्रा, ममता कुलकर्णी, मिस्टर फैसू, मीरा देवस्थले, भाविका शर्मा हे या शोमध्ये सहभागी होऊ शकतात.
आतापर्यंतचा सर्वांत मोठा सीझन
तसेच हा सीझन आतापर्यंतचा सर्वांत लांब सीझन असेल, जो सुमारे ५ महिने चालेल आणि तो प्रथम ‘जिओ सिनेमा’वर प्रसारित केला जाईल. त्यानंतर दीड तासाने तो ‘कलर्स टीव्ही’वर प्रसारित केला जाईल. पहिल्या 3 महिन्यांत सलमान खान, त्यानंतर फराह खान, करण जोहर आणि अनिल कपूर यांनी उर्वरित 2 महिने होस्ट करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही . Bigg Boss 19 |
हेही वाचा :
Raj Thackeray : राज ठाकरेंचा BMC निवडणुकीसाठी मास्टरप्लॅन; 8 नवे शिलेदार नियुक्त





