सत्ताधाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे शिक्षक बॅंकेत परिवर्तन अटळ

फलटण – प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय, अनागोंदी कारभार, बॅंकेत झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आदी कारणांमुळे या निवडणुकीत सभासद बॅंकेत परिवर्तन घडवून परिवर्तन पॅनेलला साथ देतील, असा विश्वास परिवर्तन पॅनेलचे नेते व बॅंकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी व्यक्त केला.
फलटण येथील मेळाव्यात तालुक्यातील शेकडो शिक्षक सभासदांनी सभासद परिवर्तन पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. शिक्षक संघाचे सरचिटणीस सुभाष ढालपे, तालुकाध्यक्ष द. बा. पवार, समितीचे अध्यक्ष भगवंतराव कदम, दिलीप मुळीक, नितीन करे, सुरेंद्रकुमार घाडगे, रघुनाथ कुंभार, सोमनाथ लोखंडे, डी. के. कदम अण्णासाहेब शेवते, उमेदवार शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, पुष्पलता बोबडे, निशा मुळीक आदी उपस्थित होते.
यावेळी नवनाथ गावडे, लालासाहेब भोसले आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी सभासद परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेत आता परिवर्तन अटळ असल्याची खात्री सर्वच सभासदांची झाली असल्याने ठिकठिकाणच्या सभासदांकडून सभासद परिवर्तन पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बलवंत पाटील यांनी सांगितले. सुभाष ढालपे म्हणाले, “खाबुगिरी करणाऱ्या नेतेमंडळींच्या ताब्यातून शिक्षक बॅंक खेचून आणण्यासाठी सर्व सभासदांनी केलेली पाठराखण सभासद परिवर्तन पॅनलला विजयश्री मिळवून देईल.’
बॅंकेच्या विकासाबाबत ज्यांच्याकडून अपेक्षा केली त्यांनी भ्रमनिरास केल्यामुळे सभासद परिवर्तन पॅनेलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे नवनाथ गावडे, लालासाहेब भोसले यांनी स्पष्ट केले. द. बा. पवार यांनी प्रास्ताविकात निवडणुकीतील पॅनलच्या घोडदौडीचा आढावा घेतला. यावेळी नवनाथ गावडे, लालासाहेब भोसले, रवींद्र भरते, कमलाकर टणके, भीमा चव्हाण, महादेव जाधव, मनोहर गावडे, राजेंद्र निगडे, पांडुरंग निखळे, रत्नाकर आगम, दत्तात्रय आटोळे, दत्तू नाशिरकर, सुरेश कदम, सारिका आटोळे, स्वाती ठणके, अश्विनी मोहिते, हेमलता आटोळे, यशवंत ठणके यांनी सभासद परिवर्तन पॅनलमध्ये प्रवेश करीत पॅनलच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले. कृष्णात कुंभार, राजेंद्र मुळीक, रमेश कुचेकर, मधुकर गावडे, धन्यकुमार तारळकर, उदय नाळे, नारायण सपकाळ, सतीश नलवडे, उदय शिंदे, नवनाथ धुमाळ, सोमनाथ लोखंडे, गणेश तांबे, निलेश कर्वे, हरिबा शिंदे, दत्तात्रय ढेकळे आदी उपस्थित होते. हणमंत चिंचकर यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी कदम यांनी आभार मानले.





