पुणे | गोळीबार मैदान परिसरात आज वाहतूक मार्गांत बदल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सोमवारी सकाळी सहानंतर बदल करण्यात येणार आहे. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग
१. गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्व वाहतुकीस बंद
– गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौक, उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे जावे
२. सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वाहतुकीस बंद.
– कोंढवा, लुल्लानगरमार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रस्ता, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे जावे.
३. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक बंद.
– सॅलसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
४. सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक बंद
– मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपीयर रस्तामार्गे, सीडीओ चौकातून जावे
५. भैराेबानाला चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार
– एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. कोंढवा परिसरातून येणाऱ्या सर्व वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा





