Nagar | हृदयविकार टाळण्यासाठी जीवन शैलीत बदलावा – डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी

कोपरगाव, (प्रतिनिधी): आत्ताच्या बदलती जीवन शैलीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नियमित व्यायाम, चांगली झोप, योग्य आहार, व्यसनापासून दूर राहणे, योग, प्राणायाम, नियमित आरोग्य तपासणी, तणाव मुक्त जीवन अंगीकार करण्याची गरज आहे.
प्रत्येकाने जीवन शैलीत बदल करून आपले आयुष्यमान वाढवावे, असे प्रतिपादन नाशिक येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.
जागतिक हृदय रोग दिनानिमित्त राघवेश्वर जागृत देवस्थान कुंभारी व नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हृदय रोग व मधुमेह निदान शिबीर राघवेश्वर जागृत देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
शिबिराची सुरुवात डॉ.मनोज चोपडा यांच्या हृदयरोग याविषयीच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी बालवयात होणाऱ्या हृदयरोगाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
तसेच साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटरचे डॉ.कुणाल निकम, डॉ.शैलेश बडवर तर डॉ.विजय साळुंखे, डॉ.विजय गोडगे, डॉ.विजय कदम, डॉ.विजय साळुंखे, डॉ. विलास आचारी यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी तपासणी अंती रक्तातील साखर, ईसीजी, बीपी, मधुमेही रुग्णाची मागील तीन महिन्यांची साखर (HBA1 )तपासणी देखील करण्यात आली. तसेच ज्या रुग्णांना अँजीओग्राफी ,अँजिओप्लास्टी, बायपास करावयास सांगितले आहे,
अशा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व सुविधा नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटयूटमध्ये सातत्याने होतात, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सचिन चव्हाण व मॅग्नम ग्रुपचे मधुकर पवार यांनी दिली.
राघवेश्वर जागृत देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. कुंभारी येथील राघवेश्वर मंदिरात ४०२ नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.





