वाईकरांच्या सेवेत चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे सुवर्णदालन सुरू; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाई – गेली 198 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या सुवर्णदालनाचे बुधवारी दि. 23 एप्रिल 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले.
राज्यसभा खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा. खा. नितीनकाका पाटील यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम आनंदात पार पडला. यावेळी बोलताना खासदार नितीन पाटील म्हणाले की, चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या या सुवर्णदालनामुळे वाईच्या विकासाला गतीमानता मिळणार आहे. आज पर्यंत वाईकरांना दागिने खरेदीसाठी अन्य शहरांकडे जावे लागत होते, चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या सुवर्णदालनामुळे वाईकरांना आज त्यांच्या गावातच आपले आवडते दागिने खरेदी करायला मिळणार आहेत. चंदुकाका सराफ ज्वेल्स् आणि वाईकरांचे आधीपासूनच दृढ संबंध असून भविष्यात या सुवर्णदालनामुळे ते अधिक घट्ट होतील अशी मला आशा आहे.
यावेळी बोलताना चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक अतुल शहा म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मिळून चंदुकाका सराफ ज्वेल्स चा कार्यविस्तार झाला असून समृध्द, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेल्या वाई येथे उद्घाटन होणारी चंदुकाका सराफ ज्वेल्स्ची ही सतरावी शाखा आहे. वाईसारख्या सुसंकृत शहरामध्ये आमची शाखा सुरू करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे.
यावेळी बोलताना चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक सिध्दार्थ शहा यांनी उदघाटना निमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या वतीने वाई करांसाठी मेगा ड्रॉ ऑफर सादर केली असल्याची माहिती दिली. यामध्ये रू. 25,000/- च्या पुढील दागिने खरेदीवर मेगा ड्रॉ द्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये 2 ज्युपिटर, 4 लॅपटॉप, 4 मोबाईल फोन जिंकण्याची संधी असल्याचे नमूद केले.
आजपर्यंत लाखो ग्राहकांनी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत चंदुकाका सराफ ज्वेल्स् निरंतर वाटचाल करीत आहे. वाईकरांचे प्रेम व विश्वास वृध्दिंगत होईल असा विश्वास यावेळी सिध्दार्थ शहा यांनी व्यक्त केला. लवकरच चंदुकाका सराफ ज्वेल्स्ची रबकवी (कर्नाटक) येथील शाखेचा शुभारंभ दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी होत असल्याचे त्यांनी सांगतिले.
चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल जिनदत्त शहा, संगिता अतुल शहा, सिध्दार्थ अतुल शहा, आदित्य अतुल शहा, साहस बागी, अभिनेत्री अश्विनी महांगडे, श्रृती जमदाडे, वाईचे माजी नगराध्यक्ष श्री. अनिल सावंत, जयदीप खामकार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत किसनवीर चौक वाई येथे मोठया थाटात संपन्न झाले. वाईकरांच्या सेवेत रूजु झालेले चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे हे सतरावे दालन आहे. यानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी वाईकरांसाठी विशेष ऑफर्स सादर केल्या असून याला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचा:





