Chandrayaan 3 : इस्रो कडून लँडरला अंतिम कमांड; वातावरण पोषक असल्याची दिली माहिती…..

नवी दिल्ली – भारतासोबत संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकडे लागल्या आहेत. जिथे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. संपूर्ण आज देश खूप उत्साहित आहे. चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इस्रोने इतिहास रचावा, अशी देशवासियांची इच्छा आहे.
सध्या भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. चांद्रयान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार असून अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे. त्यामुळे आता सगळ्या जगाच्या नजरा भारताच्या चांद्रयान-3 कडे लागल्या आहेत.
दरम्यान, आता इस्रो कडून लँडरला अंतिम कमांड देण्यात आली आहे. चांद्रयान-3 आजच लँडिंग होणार हे स्पष्ट आहे. अंतिम कमांड दिल्यानंतर आता टायमिंगमध्ये कोणातही बदल करता येणार नाही. किलोमीटर उंचीवरुन पावर डीसेंट स्टार्ट होईल, ज्याला रफ ब्रेकिंग फेस म्हटलं जातं. तिथून लँडर चंद्राच्या पुष्ठभागापासून 7.4 किमी उंचीवर पोहोचेल.





