Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या (Chandrapur Municipal Corporation) निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या या निवडणुकीत (Chandrapur Municipal Corporation) भाजपच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांनी अवघ्या एक मताच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा पराभव केला. मतदानाचे नेमके गणित निवडणूक प्रक्रियेत 66 सदस्यांपैकी प्रत्यक्षात पडलेली मते आणि राजकीय समीकरणे खालीलप्रमाणे राहिली. संगीता खांडेकर (भाजप): 32 मते (विजयी) वैशाली महाडोळे (काँग्रेस): 31 मते तटस्थ: वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक अलिप्त राहिले, तर MIM चा 1 सदस्य तटस्थ राहिला. भाजपला शिवसेना (ठाकरे गट) च्या निर्णायक पाठिंब्यामुळे हा विजय मिळाला. राज्यस्तरावर दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक असले तरी स्थानिक पातळीवर सत्तेसाठी हे सामंजस्य झाले. Chandrapur Municipal Corporation उपमहापौर पदावरही भाजपचा दबदबा महापौर पदासोबतच उपमहापौर पदावरही भाजपने आपला झेंडा फडकवला. भाजपचे दीपक सिंह रावत हे नवे उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत.यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेवर आता पूर्णपणे भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसला अंतर्गत भांडणाचा मोठा फटका काँग्रेसकडे २७ नगरसेवक आणि जनविकास सेनेचे ३ असे मिळून ३० चे मजबूत संख्याबळ होते. तरीही ते ३१ मतांपर्यंत पोहोचले, पण बहुमत गाठू शकले नाहीत. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर गटांमधील सुप्त संघर्ष आणि गटबाजीमुळे काँग्रेसला हा धक्का बसला. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता हुकली, ही त्यांच्यासाठी मोठी राजकीय निराशा आहे. राजकीय वर्तुळात चर्चा ही निवडणूक नाट्यमय घडामोडींनी भरलेली होती. ठाकरे गटाने काँग्रेसला धक्का देत भाजपला मदत केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून घोडेबाजारी आणि विरोधकांच्या भूमिकेचे आरोप होत आहेत, तर भाजपने ‘कमळ फुलले’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या निकालामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासावर आणि प्रशासनावर भाजपचा पूर्ण नियंत्रण आला असून, येणाऱ्या काळात स्थानिक मुद्द्यांवर काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.