Chandrakant Patil : फडणवीसांच्या नादाला लागू नका; एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू;चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Chandrakant Patil : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

Chandrakant Patil : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. त्यांच्या नादाला लागू नका; अन्यथा एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू,” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सतेज पाटलांना इशारा दिला. (Chandrakant Patil)
‘खेळणं मिळालं नाही की लहान मूल त्रागा करतं’
गेल्या १५ दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, लहान मुलाला एखादे खेळणे मिळाले नाही की ते जसा त्रागा करते, तसाच प्रकार सध्या सुरू आहे. या वागण्यामुळेच लोकांनी त्यांना ‘बंटी’ म्हणून ओळखले आहे, ‘बंटी साहेब’ म्हणून नाही, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री होण्यासाठी समजूतदारपणा आणि नेतृत्वगुण आवश्यक असतात. केवळ स्वतःची टिमकी वाजवून मुख्यमंत्री होता येत नाही, असेही पाटील म्हणाले. (Chandrakant Patil)
‘महाविकास आघाडीत बंटी पाटील एकटेच’
महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र ठामपणे उभे असल्याचा दावा करत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, महाविकास आघाडीत सतेज पाटील यांच्याशिवाय शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुठे दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. (Chandrakant Patil)
राहुल गांधी यांना कोल्हापूरबद्दल काय माहिती आहे, असा सवाल करत गोकुळचे नाव जगातील २१२ ठिकाणी पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले. (Chandrakant Patil)
डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर सवाल
चंद्रकांत पाटील यांनी डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीबाबतही प्रश्न उपस्थित केले. “एकेकाळी डी. वाय. पाटील स्कूटरवरून फिरत होते. आज एवढी अफाट संपत्ती कुठून आली?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत,” असे म्हणत सतेज पाटलांवर टीका केली. आपल्याला डिवचल्यास गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Chandrakant Patil)
सोनिया गांधींसोबतच्या फोन कॉलचा उल्लेख
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले, त्या काळातील एका कथित फोन कॉलचाही चंद्रकांत पाटील यांनी उल्लेख केला. सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या संभाषणात सतेज पाटील यांनी त्यांच्याशी कशा पद्धतीने संवाद साधला, याची माहिती आपल्याला असल्याचा दावा त्यांनी केला. या फोन कॉलचे रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचेही पाटील म्हणाले. (Chandrakant Patil)




