पुणे | चंद्रकांत पाटील कोथरूड ग्रामदैवत म्हातोबाच्या चरणी लीन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, भाजप कोथरूड दक्षिण अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी,
गणेश कळमकर, सुशील मेंगडे, गिरीश भेलके, लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा कांचन कुंबरे यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पक्ष नेतृत्वाने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली असून, त्यांना एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करायचं आहे.
आजपासून प्रत्येक मिनिट आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.





