चंद्रबाबू नायडूंनी वाढवले भाजपचे टेन्शन; रमजान महिन्याबाबत तेलंगणा पाठोपाठ आंध्र प्रदेशने घेतला ‘हा’ निर्णय

Andhra Pradesh Govt | रमजानचा महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात एक तासापूर्वी कार्यालय सोडण्याची परवानगी दिली आहे.
तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीका केली. यानंतर आता आंध्र प्रदेश सरकारमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने ही घोषणा केली. यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी भाजपची कोंडी केल्याचे दिसत आहे.
एकीकडे तेलंगणा सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजप हल्लाबोल केला असतानाच, दुसरीकडे आंध्र प्रदेशातील एनडीएचे सहयोगी चंद्रबाबू नायडू सरकारने हा निर्णय घेतला. यामुळे भाजप अस्वस्थ झाले आहे. तेलंगणा सरकारच्या निर्णयानंतर काँग्रेस भेदभाव करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. कारण नवरात्रीच्या उपवासात हिंदूंना अशी कोणतीही सूट दिली जात नाही, अशी टीका भाजपाच्या नेत्यांनी केली होती.
दरम्यान, रमजानचा पवित्र महिना १ किंवा २ मार्चपासून सुरू होऊ शकतो. मात्र, त्याआधी तेलंगणाच्या आणि त्यापाठोपाठ आता आंध्र प्रदेश सरकारमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश जारी केला आहे. यानुसार मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात एक तास आधी कार्यालयातून जाण्याची परवानगी मिळणार आहे. या आदेशानंतर मुस्लीम कर्मचाऱ्यांना इफ्तारच्या चार वाजण्यापूर्वी शाळा किंवा कार्यालय सोडता येणार आहे. राज्य सरकारचा हा आदेश २ मार्च ते ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असणार आहे. Andhra Pradesh Govt|
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार सुविधा ?
राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कामगार, आउटसोर्सिंग कर्मचारी, मंडळ आणि महामंडळाचे कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रमजानच्या महिन्यात आपल्या ऑफिसमधून एक तास लवकर जाता येणार आहे. पण आपत्कालीन किंवा विशेष गरज भासल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयातच राहावे लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने याबाबत अधिकृत आदेशही काढला आहे. मात्र तेलंगणात विरोध करणारा भाजप आता आंध्र प्रदेशात मित्रपक्षाबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Andhra Pradesh Govt |
हेही वाचा:





