चॅम्प्स करंडक क्रिकेट स्पर्धा 2024 : ज्यु. महाराष्ट्र अकादमी, सहारा क्रीककींगडमचे विजय…

Champs Trophy Cricket Tournament :- चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ज्युनियर महाराष्ट्र क्रिकेट अकादमी, सहारा क्रीककींगडम या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
धायरी येथील स्टार स्पोर्टस क्रिकेट अकादमी व सहारा क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात रणवीर चव्हाण(नाबाद 32 धावा व 4-30) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ज्युनियर महाराष्ट्र क्रिकेट अकादमी संघाने स्पोर्टस झोन क्रिकेट अकादमी संघाचा 59 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
दुसऱ्या सामन्यात संस्कार ढवळे(नाबाद 16 धावा व 3-14) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर सहारा क्रीककींगडम संघाने रन्स क्रिकेट अकादमी चा 139धावांनी धुव्वा उडवत धडाकेबाज सुरुवात केली.
निकाल : साखळी फेरी :
ज्युनियर महाराष्ट्र क्रिकेट अकादमी : 25 षटकांत 3बाद 197(आयुष पवार 66, साई टेंगळे 40, रणवीर चव्हाण नाबाद 32, अथर्व शिंदे नाबाद 22) वि.वि.स्पोर्टस झोन क्रिकेट अकादमी: 25षटकांत 3बाद 138(वेदांश भारद्वाज 29, रीतम सेन 17; रणवीर चव्हाण 4-30, सोहम काळे 2-19); सामनावीर – रणवीर चव्हाण;
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-rajasthan-royals-took-a-big-decision-included-this-deadly-spinner-in-the-team-in-place-of-adam-zampa/
सहारा क्रीककींगडम : 25षटकांत 3बाद 208(राजवीर बनसोडे 58, कार्तिक कोदगिरे 53, ईशान शेळके 37; श्रेयांश गिजरे 1-19) वि.वि.रन्स क्रिकेट अकादमी: 18.4 षटकांत सर्वबाद 69 (नुरुप बोरकर 21; संस्कार ढवळे 3-14, वेदांग जागडे 2-2, अर्णव नेमाडे 2-0, आदित्य भोसले 2-14); सामनावीर – संस्कार ढवळे.





