अनुष्काचा ‘चकदा एक्सप्रेस’ रिलीज होणार नाही? रेणूका शहाणेंनी व्यक्त केली नाराजी

Renuka Shahane | अभिनेत्री अनुष्का शर्मा बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळालेली नाही. २०१८ साली ती शेवटची ‘झीरो’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती ‘चकदा एक्सप्रेस‘ या चित्रपटात दिसणार असल्याच्या देखील चर्चा झाल्या.
त्यानंतर या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. यामध्ये रेणुका शहाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. परंतु, माध्यमांच्या वृत्तानुसार आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत रेणुका शहाणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारताची स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’साठी अनुष्का शर्मा मेहनत घेत होती. या सिनेमाच्या शूटिंगला 2022 मध्ये सुरुवात झाली होती आणि सिनेमाचे शूटिंग 2023 मध्ये पूर्ण झाले आहे. Renuka Shahane |
दिग्दर्शक प्रोसित रॉय दिग्दर्शित ‘चकदा एक्सप्रेस’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. परंतु,काही कारणांनी ती डील रद्द झाली. या चित्रपटाची निर्मिती अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्झच्या बॅनर अंतर्गत झाली होती. मात्र आता रेणुका यांनी सुरू असणाऱ्या चर्चेविषयी दु:ख व्यक्त केले. Renuka Shahane |
काय म्हणाल्या रेणुका शहाणे ?
रेणुका म्हणाल्या की, ‘मला खूपच दु:ख झाले. कारण मला वाटते की सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. अनुष्काने त्यासाठी स्वतःवरही खूप काम केले होते. झुलन गोस्वामी या एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्या अतिशय गरीब घरातून आल्या आणि त्यांनी मोठे काम केले. तरीही मी म्हणेन, पुरुष आणि महिला क्रिकेट, तसेच इतर सर्व खेळांमध्ये अजूनही तफावत आहे. चकदा एक्सप्रेसमध्ये ती खिलाडूवृत्ती होती.’
रेणुका यांनी अनुष्काचेही कौतुक केले होते. “अनुष्कानेही यासाठी स्वत:वर खूप काम केलं होतं. यामध्ये मी जे सीन केले ते खूप चांगले होते आणि महत्त्वपूर्ण होते. विशेष करून क्रीडा क्षेत्रातील स्त्रियांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे,” असेही त्यांनी असेही म्हटले.
हेही वाचा :





