‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा लांबणीवर; अभिनेत्री अनुष्का शर्मा बॅालीवूड सोडणार?

Actress Anushka Sharma : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी सामन्यातून १२ मे २०२५ रोजी निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. बीसीसीआयने देखील विरोटची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली होती. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
यामुळे १४ वर्षांचा कसोटी क्रिकेटमधील विराटचा प्रवास थांबला असल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता क्रिकेटवर आधारित अनुष्का शर्माचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट लांबणीवर पडणार असल्याची बातमी समोर आली आहे. या चित्रपटातून अनुष्का बॅालीवूडमध्ये पुन्हा कमबॅक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटातून अभिनेत्री अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या भूमिका साकारणार आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत माजी क्रिकेटर झुलन गोस्वामी यांनी या त्यांचं मत व्यक्त केले आहे. “मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि सगळेजण मलाच विचारत आहेत. मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये.” त्यामुळे आता चित्रपटाचे निर्माते यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खरंतर हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार होता. पण नंतर चित्रपट लांबणीवर पडला असून दोन वर्षांपासून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलली नाही. त्यातच क्रिकेटर झुलन गोस्वामीने यावर भाष्य न करणार असल्याची प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे.
हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार, हा चित्रपट जवळपास पूर्ण झाला होता. काही व्हीएफएक्स शॉर्ट चित्रित करणं बाकी होतं पण त्यापूर्वीच या चित्रपटाचं काम बंद झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक मतभेत आणि चित्रपटाचं वाढतं बजेट यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. मात्र, अद्यापर्यंत चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थ्यांनी कोणतही अधिकृत विधान याबद्दल केलेलं नाही. तर दुसरीकडे अनुष्काने बॅालीवडूला रामराम केल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे.





