#CaronaVirus: चीनमध्ये 250 भारतीय विद्यार्थी अडकले

बीजिंग : चीनमध्ये पसरलेल्या कॅरोना विषाणूमुळे तेथे अडकलेल्या सुमारे 250 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची भारतीय पालकांना चिंता वाटते आहे. भारत सरकारतर्फे चिनी सरकार बरोबर बोलणी सुरू असून, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी चिन सरकार सर्व पर्यायावर विचारत करीत असल्याचे म्हंटले आहे.
चीनमधील वुहान हे करोना विषाणूच्या प्रसाराचे केंद्र आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार रविवारी करोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्याची संख्या 56 वर पोहचली आहे. 23 विदेशी नागरिकांसह दोन हजार 8 लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.
असे मानले जाते आहे की, सुमारे 700 भारतीय विद्यार्थी चीनच्या विविध विद्यापीठांत शिक्षण घेतात. केरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून चिनी अधिकाऱ्यांनी वुहानसह इतर 12 शहरे पूर्णपणे बंद केली आहेत.
चीनमध्ये राहणारे बहुतेक भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यातील बहुतेक विद्यार्थी चिनी नववर्षाच्या सुट्टीमुळे आठवड्यांपूर्वी निघून गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 250 ते 300 भारतीय विद्यार्थी अजूनही चीनच्या विविध शहरात वास्तव्यास आहेत. तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल भारतीय पालकांमध्ये चिंता आहे.





