Carlos Alcaraz Shirtless : स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझला शर्टलेस कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उडाली झुंबड, पाहा VIDEO
Carlos Alcaraz Shirtless : टेनिसपटू कार्लोस अल्काराझ तिसऱ्या फेरीतील सामन्यानंतर शर्टलेस झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे.

Carlos Alcaraz Shirtless Moment US Open 2026 Outfit Controversy Wu Yibing Win : अमेरिकन ओपन २०२६ (US Open 2026) स्पर्धेत गतविजेता आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ (Carlos Alcaraz) याने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. तिसऱ्या फेरीतील एकतर्फी लढतीत अल्काराझने चीनच्या वू यिबिंगचा ६-३, ६-४, ६-१ असा धुव्वा उडवत चौथ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, मैदानावरील विजयापेक्षाही सामन्यानंतर अल्काराझने भर कोर्टवर टी-शर्ट काढल्याने आर्थर ॲश स्टेडियममध्ये उपस्थित महिला चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि तो क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कपड्यांचा वाद भोवला; यंदा अंडरशर्ट घालून उतरला अल्काराझ!
स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रसिद्ध रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या ‘कॅक्टस जॅक’ आणि नाईकीच्या आउटफिटमध्ये खेळताना अल्काराझची टी-शर्ट सारखी सरकत होती. यामुळे त्याचा उजवा निप्पल वारंवार कॅमेऱ्यात कैद होत असल्याने सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. या वादानंतर शुक्रवारी तिसऱ्या फेरीच्या लढतीत अल्काराझने मुख्य टी-शर्टच्या आत एक अतिरिक्त अंडरशर्ट परिधान करून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कोणतीही अनावधानाने होणारी चूक टळली.
शर्ट काढताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष; महिला फॅन्सचे रिॲक्शन्स व्हायरल –
The reactions when Carlos Alcaraz took off his shirt 😂 pic.twitter.com/Wj31ZKcdev
— SportsCenter (@SportsCenter) September 4, 2026
सामना संपल्यानंतर अल्काराझने अंगावरील दोन्ही शर्ट काढून बॅगेत ठेवले, तेव्हा स्टेडियममधील प्रेक्षक स्तब्ध झाले. अल्काराझचा शर्टलेस अंदाज पाहून अनेक महिला चाहत्यांनी एकच जल्लोष केला आणि स्मार्टफोन काढून त्याचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. सामन्यानंतर हसतमुखाने अल्काराझ म्हणाला, “माझे शरीर गेल्या काही दिवसांत कॅमेऱ्यात जास्तच उघडे पडले होते! त्यामुळे आज मी अंडरशर्ट घालून खेळलो, ज्याने मला अधिक कम्फर्टेबल वाटले.”
चौथ्या फेरीत टॉमी पॉलशी मुकाबला; विजेतेपदावर नजर –
या सर्व ड्रामाच्या पलीकडे अल्काराझने खेळावरील आपले लक्ष ढळू दिलेले नाही. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये त्याने केवळ एक सेट गमावला असून तो भन्नाट लयीत दिसत आहे. आता रविवारी चौथ्या फेरीत अल्काराझचा सामना अमेरिकेच्या २०व्या मानांकित टॉमी पॉलशी रंगणार आहे. या स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी अल्काराझला पॉलविरुद्धची ही कठीण परीक्षा पार करावी लागणार आहे.





