Duleep Trophy Final : दुलीप ट्रॉफीच्या फायनलचा थरार चेपॉकवर रंगणार! गौतम गंभीरने फक्त ‘या’ तीन खेळाडूंना दिली खेळण्याची परवानगी
Duleep Trophy Final : चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉक स्टेडियमवर साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात रविवारी विजेतेपदासाठी चुरशीची लढत होणार आहे.

Duleep Trophy 2026 Final South Zone vs East Zone Tilak Varma Ishan Kishan KL Rahul Siraj : भारताच्या प्रतिष्ठेच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा म्हणजेच दुलीप ट्रॉफी २०२६ (Duleep Trophy 2026) चा महाअंतिम सामना रविवारपासून रंगणार आहे. चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉक स्टेडियमवर साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात विजेतेपदासाठी चुरशीची लढत रंगेल. साऊथ झोनने नॉर्थ झोनला, तर ईस्ट झोनने सेंट्रल झोनला नमवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. १३ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका सुरू होत असताना, १० सप्टेंबरला संपणाऱ्या या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गंभीरचा मोठा निर्णय; इशान, तिलक आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरणार! (Duleep Trophy Final)
अफगाणिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० संघात निवड झालेले तिलक वर्मा, इशान किशन आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी या अंतिम सामन्यात खेळणार की नाही, याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर काय निर्णय घेतात याकडे लक्ष होते. अखेर तिन्ही स्टार्सना खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. इशान किशन ईस्ट झोनचे नेतृत्व करेल, तर तिलक वर्मा साऊथ झोनचा कर्णधार असेल. वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनचा उपकर्णधार म्हणून मैदानात दिसेल. हे खेळाडू फायनल संपल्यानंतर १० सप्टेंबरला थेट दिल्लीला रवाना होतील.
मोहम्मद सिराज अन् पडिक्कल संघात; केएल राहुल मात्र फायनलमधून बाहेर! (Duleep Trophy Final )
साऊथ झोनच्या ताफ्यात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत सलग दोन शतके ठोकून ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरलेला पडिक्कल भन्नाट फॉर्मात आहे. मात्र, स्टार फलंदाज केएल राहुलने या अंतिम सामन्यातून माघार घेतली असून तो चेपॉकवर खेळताना दिसणार नाही.
KL bhai (Rahul) isn’t there: Tilak Varma.@Fancricket12 pic.twitter.com/04oVGw96Pg
— RevSportz Global (@RevSportzGlobal) September 5, 2026
अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ: (Duleep Trophy Final)
साऊथ झोन: तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई, एसके रशीद, के साई तेजा, टी विजय, अभिनव तेजराना, के हिमतेजा, टी त्यागराजन, आर स्मरण, करुण नायर, श्रेयस गोपाल, विदवथ कावेरप्पा, एमडी निधीश, एन जगदीसन, अमन खान, देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज.
ईस्ट झोन: इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), डेनिश दास, अभिमन्यू ईश्वरन, सुदीप घरामी, शाहबाज अहमद, सूरज जयस्वाल, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, कुमार कुशाग्र, शिखर मोहन, अनुकूल रॉय, विराट सिंह, सुभ्रांशु सेनापती, अभिजित सरकार.





