मुंबई-पुणे महामार्गावर द ‘बर्निंग’ कारचा थरार! मोठी वाहतूककोंडी, वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगा
Updated On:

पुणे- शनिवार, रविवार आणि १ मे अश्या सलग सुट्ट्या, लग्नसराई यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे घराबाहेर पडल्याने मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अश्यातच आज दुपारच्या सुमारास या मार्गावर एक कारने पेट घेतला आणि या मार्गावरील संपूर्ण वाहतूक कोंडी झाली.
त्यामुळे बोरघाटात तब्बल १० किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. अनेक तास प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांच्या देखील नाकी नऊ आले होते.
दरम्यान, गाडीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. ही आग एवढी भीषण होती की त्यात कार भस्मसात झाली. कारने पेट घेतल्यामुळे एका बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला. हा अपघात खोपोलीजवळ पुणे मार्गावर घडला असून सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.





