प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २ ऑक्टोबर रोजी पहाटे एक वाजताच्या सुमारास जुना मुंबई–पुणे हायवेवर घडला. अलोक दिलीप पटेल (वय ३२, रा. पदमाजी साईडवर, चिंचवड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. धर्मेंद्र विश्वंभर सिंह (वय ५२, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, पंचनाथ चौक, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रणजित हिरामन चौहान (वय २६, रा. पदमाजी साईडवर, चिंचवड, मूळगाव मायापुरा, जि. देवरिया, उत्तरप्रदेश) असे जखमीचे नाव असून त्यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित चौहान व त्याचा मित्र अलोक दिलीप पटेल हे दुचाकीवरून जात असताना आरोपीच्या ताब्यातील भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अलोक पटेल यांचा जागीच मृत्यू झाला तर चौहान जखमी झाले. अपघातात मोटारसायकलही पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली. या प्रकरणाचा तपास देहुरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दुगावकर करीत आहेत.