Sunil Tatkare : कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राजकारण तापलं! रुपाली चाकणकरांच्या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले…
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकरणावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य करणे टाळले आहे.

Sunil Tatkare : 18 मार्चपासून राज्यभरात नाशिक येथील स्वतः भोंदू बाबा म्हणून घेणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणात आता राजकीय कनेक्शन होत असल्याचा आरोप केला जात असून, अनेक नेत्यांसोबत अशोक खरात फोटो व्हायरल झाले आहेत. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. Sunil Tatkare
नुकतीच या प्रकरणावर पक्षाचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यानी मोठी प्रतिक्रिया दिली होती. “भोंदु बाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आहे आणि घाणेरडा आहे. त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे, त्याच प्रमाणे या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत, त्यावर आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून योग्य कार्यवाही करणार आहे आणि ते येणाऱ्या काळात दिसेल.” असे ते म्हणाले होते. या विधानातून पटेलांनी रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा : Nayyi Navelli Movie: ‘धुरंधर २’नंतर यामी गौतमचा नवा धमाका; ‘नई नवेली’ OTT वर घालणार धुमाकूळ!
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी या प्रकरणावर बोलणे टाळले आहे. अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारला असात सुनील तटकरे संतापले ही जागा बोलायची नाही. योग्य वेळी बोलेन. असे म्हणते त्यांनी या प्रकरणी बोलणे टाळले आहे. Sunil Tatkare

Sunil Tatkare news
कॅप्टन अशोक खरात प्रकरणात उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत गंभीर आरोप केले आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील चाकणकरांवर आरोपांची राळ उठवत राजीनाम्याची मागणी केली आहे. Sunil Tatkare
हेही वाचा : Balen Shah: नेपाळमध्ये २७ मार्चला ‘बालेन शाह’ घेणार पंतप्रधानपदाची शपथ ; गगन थापांनी दिला पदाचा राजीनामा





