Rupali Patil Thombre Post : पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अॅड. रुपाली पाटील ठोंबरे पराभूत झाल्या. त्यांनी प्रभाग क्रमांक 25 आणि 26 या दोन प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. या दोनही प्रभागातून रुपाली पाटील यांना पराभव झाला होता. मतमोजणी दरम्यान त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. अशातच आता रुपाली पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना टोलर्संना थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर बंधु, भगिनी, वडील मंडळी तसचे पोर्टल, न्यूज चॅनेल वालो माझ्या बाबतीत संदर्भात जाणीवपूर्वक हेतुपरस्पर फेक नेरेटिव पोस्ट, बदनामीकारक पोस्ट, अश्लील कमेंट कृपया करुच नये. वैचारिक मनभेद असतील, आपण माहिती घेऊन तपासून खात्री करून मगच व्यक्त व्हावे किंवा पोस्ट करावी, असे आवाहन रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे. पुढे त्या म्हणाल्या, आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये. अन्यथा नाहक आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल व गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल, असा थेट इशारा त्यांनी टोलर्संना दिला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे फेक नेरेटिव पसरवणाऱ्या ट्रॉलर्सला माझ्या बाबतीत कोणतीच चुकीच्या बदनामीच्या पोस्ट करू नये. जाणीवपूर्वक गैरसमज करणाऱ्या पोस्ट करू नये. अशी विनंती त्यांनी केली आहे. मी व माझी सोशल टीम परिवार ट्रॉलर्सला जशास तसे उतर देण्यास समर्थ आहोतच पण त्यासोबत कडक कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यास तत्पर आहे. त्यामुळे ट्रॉलर्स तो कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो संविधानाने, कायद्याने, घटनेने कायदेशीर कारवाईस पात्र राहील. नो फेक नेरेटिव नो बदनामी पोस्ट, नो अश्लील कमेंट्स नो अब्रुनुकसान नो समाज भावना दुखावणे. हीच जाहीर नोटीस समजावी. असेही पोस्टमध्ये रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी ११९ जागा जिंकल्या आहेत. सर्व पक्षांना मागे टाकते भाजपने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित करत पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अनेकांना पराभव झाला आहे. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे तसेच राष्ट्रवादीच्या माजी प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांचा देखील पराभव झाला आहे. हेही वाचा : Mayor’s Reservation : मोठी बातमी! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण ‘या’ दिवशी होणार जाहीर