ICC Women’s T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चुका परवडणाऱ्या नाहीत – उपकर्णधार मंधाना

ICC Women’s T20 World Cup 2024- ऑस्ट्रेलिया हा माजी विजेता संघ आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ एलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली सुरुवात करणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावीच लागेल, असे स्पष्ट मत भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मंधानाने बोलताना सांगितले.
ऑस्ट्रेलियाने महिला टी-२० विश्वकरंडक तीन वेळा जिंकला आहे. यात सर्वात मोठे योगदान माजी कर्णधार मेग लॅनिंगने दिले होते. मात्र, लॅनिंगच्या निवृत्तीनंतर एलिसा हिलीने ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतली आहे. उद्यापासून सुरुवात होणाऱ्या या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ एलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत सहभागी होणार आहे.
भारतीय संघाची विश्वकरंडक स्पर्धेच्या मोहिमेला न्यूझीलंड विरुद्धच्या सामान्यांपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत ‘अ’ असणार आहे. या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड व पाकिस्तान हे संघ असणार आहेत. पहिल्या सामनापूर्वी बोलताना स्मृती मंधाना म्हणाली की, विश्वकरंडक स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्वाचा आहे. न्यूझीलंडपासून या मोहिमेची सुरुवात होणार असून श्रीलंका हा देखील बलाढ्य संघ आमच्याच गटामध्ये खेळणार आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलिया संघ देखील या स्पर्धेत महत्वाचा संघ असून, त्याच्या विरुद्ध आम्हाला कोणत्याही चुका आम्ही करू शकत नाहीत.
तयारी करूनच मैदानात…
भारताच्या सर्व लढती शारजाह व दुबई येथे होणार आहेत. यावेळी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे या उष्णतेचा सर्वच खेळाडूंना सामना करावा लागतो. या संदर्भात बोलताना स्मृती म्हणाली की, माझ्यासाठी विश्वचषकातील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्या सर्वं सामन्यामध्ये आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. इथल्या उष्णतेत दिवसाचे सामने आव्हानात्मक असतील पण देशासाठी खेळताना कोणतेही निमित्त चालणार नाही. त्यासाठी योग्य ती तयारी करूनच मैदानात उतरावे लागेल.
पाकिस्तानविरुद्धचा सामना हा नेहमीच भावनांनी भरलेला असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्ध्यामध्ये दोन्ही संघांच्या समर्थकांच्या भावनांचा समावेश असतो. असे नाही की खेळाडू एकमेकांशी बोलत नाहीत पण दोन्ही देशांतील वाढत्या भावनांमुळे सामना अधिकच रोमांचक होतो.
– स्मृती मंधाना
ऑस्ट्रेलिया विरुद्धची लढत
भारत ४ ऑक्टोबरपासून विश्वकरंडक मोहिमेची सुरुवात करणार आहे. न्यूझीलंड नंतर भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. आशिया करंडक जिंकणारा श्रीलंका संघासोबत त्यानंतर लढत असणार आहे. भारताची साखळी फेरीतील शेवटची लढत ऑस्ट्रेलिया संघासोबत असणार आहे. प्रत्येक गटातून टॉप २ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लढतीपूर्वीच्या तीनही लढती भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल.
IND vs BAN : भारताच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ..! जाणून घ्या, पॉइंट टेबलची स्थिती…
भारतीय महिला संघाच्या लढती : साखळी फेरी
४ ऑक्टोबर २०२४ – भारत वि न्यूझीलंड : दुबई
६ ऑक्टोबर २०२४ – भारत वि पाकिस्तान : दुबई
९ ऑक्टोबर २०२४ – भारत वि श्रीलंका : दुबई
१३ ऑक्टोबर २०२४ – भारत वि ऑस्ट्रेलिया : शारजाह





