Karnataka News : धक्कादायक ! केकमध्ये आढळले कॅन्सरचे घटक; कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी
Updated On:

बंगळुरू – कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या तपासणीत केकमध्ये कर्करोग पसरवण्यास जबाबदार असलेले घटक आढळले आहेत.
बंगळुरूमधील वेगवेगळ्या बेकरीतून घेतलेल्या केकच्या 12 नमुन्यांमध्ये हानिकारक पदार्थ आढळले. यानंतर राज्य सरकारने लोकांना सतर्क केले आहे.
223 नमुन्यांपैकी 12 मध्ये कृत्रिम रंगांचा वापर धोकादायक असल्याचे आढळले. यापैकी रेड वेल्वेट, ब्लॅक फॉरेस्टसारखे केक याच रंगांद्वारे बनवले जातात. यामध्ये आढळणाऱ्या घटकांमुळे कर्करोग होतो, असे विभागाने म्हटले आहे.





