“एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच”; ‘तो’ व्हायरल मेसेज शेअर करत सुप्रिया सुळेंनी दिले ओपन चॅलेंज

Supriya Sule | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांनासुद्धा 17 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट करत थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी मोबाईवरील एक मेसेजचा फोटो शेअर केला आहे. ज्यानंतर त्यांनी एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवाच, असे आव्हान दिले आहे. Supriya Sule |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो,… pic.twitter.com/lRiUz3e1Kv
— Supriya Sule (@supriya_sule) August 17, 2024
सुप्रिया सुळे यांचे ट्वीट – Supriya Sule |
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवत आहेत.. बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये काय लिहिले आहे? Supriya Sule |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे approved मेसेज आला आहे. त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे. यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे.
तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सर्वांनी येणे आवश्यक आहे, ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल, असं सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटले आहे.
अर्ज भरण्यास मुदतवाढ – Supriya Sule |
दरम्यान, या योजनेबाबत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना याबाबत माहिती दिली आहे. ज्या महिलांचे अर्ज भरणे बाकी होते तसेच त्रुटी होत्या त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते.
हेही वाचा:





