पारायण करायला आला अन् संसार मोडून गेला… आयोजकाची पत्नी घेऊन…

नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे, एका माणसाने त्याच्या घरी रामकथा परायणाचे आयोजन केले होते. मात्र जे पारायण त्याला चांगलेच महागात पडले.
नेमकं झालं असं की, कथावाचनासाठी आलेल्या कथावाचकाच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीला पळवून नेल. पीडित पतीने पोलीस स्थानिक पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे हे पीडित राहुल तिवारी यांच्या पत्नीसह पळून गेले. यानंतर महिलेच्या पतीने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 1 महिन्यानंतर जेव्हा तक्रारदाराची पत्नी सापडली आणि तिला पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावले. त्यामुळे तिने पतीसोबत राहण्यास नकार देत नरोत्तमा दास यांच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
ही बाब २०२१ सालची आहे. महिलेचे पती राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात रामकथेचे आयोजन केले होते. चित्रकूटचे कथाकार धीरेंद्र आचार्य यांना कथा वाचनासाठी बोलावण्यात आले.
यादरम्यान आचार्यांसह त्यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे हेही राहुल तिवारी यांच्या ठिकाणी रामकथा सांगण्यासाठी आले होते. कथेदरम्यान नरोत्तम दास यांनी पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप राहुल तिवारीने केला आहे. यानंतर दोघेही मोबाईलवर बोलू लागले आणि गेल्या महिन्यात ५ एप्रिल रोजी राहुलच्या पत्नीला घेऊन गेले. असा आरोप आता राहुल तिवारी यांनी केली आहे.
अशात महिला परत आल्यावर तिला पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले, मात्र महिलेने पतीसोबत राहण्यास नकार दिला. त्याचवेळी जिल्ह्याचे एसपी अमित सांघी म्हणाले की, वादामुळे महिलेला पतीसोबत राहायचे नव्हते, त्यामुळे केस काढली जात नाही. मात्र, पोलीस तपास करत आहेत.





