Rahul Gandhi : “विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे लज्जास्पद”; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वसमावेशक सुधारणा अत्यंत आवश्यक आहेत.

Rahul Gandhi – काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. त्यांनी आरोप केला की, केंद्र सरकार सत्तेच्या अशा अहंकाराने ग्रासले आहे की, जे विद्यार्थी केवळ आपले हक्क, निष्पक्ष परीक्षा आणि चांगल्या भविष्याची मागणी करत आहेत, त्यांना दहशतवादी ठरवतानाही सरकारला संकोच वाटत नाही.
राहुल गांधींनी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद केले. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीसामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आणि अनेक तरुणांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला. त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यवस्थेविरुद्ध जे आवाज उठवत आहेत, त्यांनाच आता लक्ष्य केले जात आहे.
सरकार टीकाकारांची बदनामी करण्याचे राजकारण करत आहे. त्यांनी निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना यापूर्वी व्यावसायिक आंदोलक आणि परजीवी म्हटले गेले, सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रविरोधी ठरवले गेले आणि आता आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना व तरुणांना दहशतवादी म्हटले जात आहे, याकडे लक्ष वेधले.
राहुल गांधींनी टिप्पणी केली की, सरकारच्या राजकारणाचा आधार आता उत्तरे देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्ला करण्याकडे सरकला आहे. सरकारी धोरणांवर प्रश्न विचारणाऱ्या कोणालाही विरोधक किंवा देशद्रोही ठरवले जाते.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशभरातील कोट्यवधी विद्यार्थी आणि तरुणांची जाहीर माफी मागावी. शिक्षण व्यवस्थेतील सततच्या त्रुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
माझ्यावर कितीही राजकीय हल्ले झाले तरी विद्यार्थी आणि तरुणांशी संबंधित मुद्दे मांडणे थांबवणार नाही. देशाची शिक्षण व्यवस्था हळूहळू एका खंडणीखोरीच्या रॅकेटमध्ये रूपांतरित होत आहे. या परिस्थितीला असेच चालू दिले जाऊ शकत नाही.
प्रत्येक मुलाला परवडणारे व दर्जेदार शिक्षण आणि परीक्षांची न्याय्य पद्धत उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. याच उद्देशाला समोर ठेवून विद्यार्थी आणि तरुणांच्या हितासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.
देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वसमावेशक सुधारणा अत्यंत आवश्यक आहेत.
– राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते






