पिंपरी | बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

देहूगाव, ( वार्ताहर ) –
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥
आषाढी एकादशी निमित्त तिर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरात भाविकांनी बुधवारी ( दि.१७ ) पहाटे पासूनच दर्शनार्थ गर्दी केली होती.भाविकांच्या गर्दीने परिसरात भक्तीमय वातावरण झाले होते. वाढत्या गर्दीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप होते. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर व प.िरसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
” युगे अठ्ठावीस विटेवरी उभा,वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा “
युगेन युग कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असणारा श्री विठ्ठल अर्थात पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुर मध्ये लाख्खो भाविक भक्तांची अर्थात वारकऱ्यांची मांदियाळीचे मेळा भरतो.
तीर्थक्षेत्र देहूहून श्री संत तुकाराम महाराज यांची, तीर्थक्षेत्र आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातूनही अनेक संतांच्या पालखी सोहळा पंढरपूर मध्ये दाखल होत असतात.
या पालखी सोहळयात सहभाग घेवू न शकणारे वारकरी, भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त देहूनगरीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,श्री विठ्ठल रूक्मीणीच्या दर्शनार्थ पहाटे पासूनच गर्दी केली होती. यंदा भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याची दिसून आली. मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भाविकांच्या गर्दीने जणू परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
पहाटे पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर भाविकांनी स्नान करण्यासाठी गर्दी केली होती.मावळ तालुक्यात पडणाऱ्या पावसाने इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरून वाहत होते. मुख्य मंदिरातील भजनी मंडपामध्ये भजनी मंडळाचे भजन सुरू होते.अधून मधून तुरळक पावसाचा सर येऊन जात येत होते.ढगाळ वातावरणात ही अधून मधून ढगामधुन सूर्यं डोकावत होते.
भाविकांच्या घाटावरील,मंदीर परीसरातील गर्दीने,मंदिरातील आकर्षक फुलांच्या सजावटीने,भक्तिमय वातावरण तर प्रसन्न व मनमोहक झाले होते. ” ज्ञानोबा माऊली,ज्ञानराज माउली तुकाराम तुकाराम तुकाराम” विठ्ठल विठ्ठल” माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम हरि ” नामाच्या जय घोषाने देहूनगरी भक्तीरसात न्हावून निघत होती.
मुख्य मंदिरामध्ये भाविकांना दर्शन बारीने दर्शनासाठी सोडण्यात येत होते. श्री संत तुकाराम जन्मस्थान मंदिर व वैकुंठगमन स्थान मंदिरात दर्शनार्थ रांगा लागल्या होते.सामाजिक सेवा करणारे काही कार्यकर्ते रांगा लावून घेत होते.
देहू परीसर भाविकांच्या गर्दीने तर हरिनामा च्या गजराने भक्तीमय झाले होते. वाहनतळाची सुविधाच नसल्याने वाहन चालकांनी इंद्रायणी घाटावर तर नदी पुलावर वाहने उभी केली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील उभ्या वाहनांनी वाहतूक कोंडी होत होती.





