Mahayuti Politics: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्यांची होणार गच्छंती? शिंदे दिल्ली दौऱ्यावर
Mahayuti Politics: उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Mahayuti Politics: राज्यातील महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, शिवसेना (शिंदे गट) कोट्यातील काही विद्यमान मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्र्यांच्या खात्यांचा घेतला आढावा – (Mahayuti Politics)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कामगिरीत मागे पडलेले तसेच सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्ष आणि महायुतीची डोकेदुखी वाढवणाऱ्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. संबंधित मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

Mahayuti Politics: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्यांची होणार गच्छंती? शिंदे दिल्ली दौऱ्यावर
यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर इतरांनाही सत्तेत आणि मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली जाईल,” असे विधान केले होते. आता त्या विधानाचा संदर्भ घेत विद्यमान मंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, संभाव्य फेरबदलाचे संकेत मानले जात आहेत.
कोणाचा पत्ता कट होणार? (Mahayuti Politics)
दरम्यान, पक्षातील निष्ठावान आणि वरिष्ठ आमदारांना संधी देण्यासाठी काही विद्यमान मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देत मंत्रिपदावरून बाजूला केले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी विस्तारात कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत महायुती सरकारमध्ये मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात.





