NIA filed charge sheet : नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटा प्रकरणी एनआयएने १० आरोपींविरुद्ध ७,५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तपास यंत्रणेच्या मते, हा हल्ला एका सुनियोजित दहशतवादी कटाचा भाग होता. आरोपपत्रानुसार, सर्व आरोपी ‘अन्सार गझवत-उल-हिंद’ या संघटनेशी संबंधित होते, जी अल-कायदापासून प्रेरित असल्याचे मानले जाते. या स्फोटात मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी यांचा मृत्यू झाला. आरोपपत्रात इतर नऊ आरोपींचीही नावे आहेत. (NIA filed charge sheet) त्यासोबतच “आरोपींनी २०२२ मध्ये श्रीनगर येथे एका गुप्त बैठकीद्वारे ही संघटना पुन्हा सक्रिय केली आणि ‘ऑपरेशन हेवनली हिंद’ या नावाने देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला असल्याचे तपासातून समोर आले आहे.तपास संस्थेच्या मते, देशाची लोकशाही व्यवस्था कमकुवत करणे आणि मूलतत्त्ववादी राजवट लादणे हा या योजनेचा उद्देश होता. एनआयएने यासंदर्भात दावा करताना, “आरोपींनी सहज उपलब्ध असलेल्या रसायनांपासून टीएटीपी (टायटॅनियम डायऑक्साइड) सारखी स्फोटके तयार केली होती. कार बॉम्बमध्ये याच स्फोटकाचा वापर करण्यात आला होता. असे म्हटले आहे. (NIA filed charge sheet) NIA filed charge sheet : “हल्ला हा दहशतवादी कटाचाच भाग” ; दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयएकडून मोठा खुलासा, आरोपपत्र दाखल त्यासोबतच तपासादरम्यान, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकून पुरावे गोळा करण्यात आले. एजन्सीने सांगितले की, काही आरोपी व्यवसायाने डॉक्टर होते आणि कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होऊन ते या गटात सामील झाले होते. त्यांच्याकडे एके-४७, क्रिन्कोव्ह रायफल आणि गावठी पिस्तूल यांसारखी बेकायदेशीर शस्त्रेही आढळून आली. तपासात असेही उघड झाले की, ते ड्रोन आणि रॉकेटचा वापर करून स्फोटक हल्ले करण्याची तयारी करत होते. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून, इतर अनेक संशयितांचा शोध सुरू आहे. एनआयएने म्हटले आहे की, तपास सुरू असून फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. NIA filed charge sheet :