By Election Announced : केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख (By Election Announced) जाहीर केली आहे. तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून, पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. या निवडणुकांसोबतच (By Election Announced) देशभरातील विविध राज्यांतील ८ विधानसभा रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. हे पण वाचा : Goa CM : गोव्यात आमचाच मुख्यमंत्री होणार; शिवसेना शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य By Election Announced बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम (By Election Announced) निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026 उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026 अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026 अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026 मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026 मतमोजणी : 4 मे 2026 निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026 बारामतीत सुनेत्रा पवार उमेदवारी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) बारामती ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे. एनसीपी (शरदचंद्र पवार गट) कडून या जागेवर उमेदवार उभारला जाणार नसल्याची माहिती आहे. यामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इतर पक्ष किंवा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करतात का? हे पाहावे लागेल. सुनेत्रा पवार या बारामतीच्या पारंपरिक कुटुंबीय मतदारसंघातून निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश करणार असून, त्यामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाला घटनात्मक वैधता मिळेल. राजकीय महत्त्व बारामती ही पवार कुटुंबाची अभेद्य किल्ला मानली जाते, तर राहुरी ही अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाची जागा आहे. या दोन्ही पोटनिवडणुका महाराष्ट्रातील महायुती आणि मविआ यांच्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम टाकू शकतात. विशेषतः बारामतीत भावनिक मुद्दे आणि सहानुभूती लाट यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. निवडणूक आयोगाने सर्व उमेदवार आणि पक्षांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. या पोटनिवडणुकांसह देशातील इतर ६ रिक्त जागांसाठीही मतदान २३ एप्रिलला होईल. हे पण वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! लाभार्थी महिलांना मिळणार थेट 3 हजार रुपये