Rohit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू झालेल्या विमान अपघातासंदर्भात कोणीतरी व्हीएसआर व्हेंचर्सला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे (शप) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एएआयबीच्या प्राथमिक चौकशीबाबत त्यांनी आधीच उपस्थित केलेल्या शंकांही खऱ्या ठरल्याचा दावा त्यांनी केला. व्हीएसआर कंपनीवर भूतकाळात अनेक गंभीर चुका केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रोहीत पवार म्हणाले, व्हीएसआर व्हेंचर्सच्या लिअरजेट विमान अपघातासंबंधी २२ पानांच्या प्राथमिक अहवालात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने म्हटले आहे की अपघाताच्या वेळी दृश्यमानता आवश्यक पातळीपेक्षा कमी होती. धावपट्टीवरील फिकट खुणा आणि धावपट्टीच्या पृष्ठभागावर रेती आढळल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मी व्हीएसआर किंवा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) विरोधात नाही. अजितदादा व्हीएसआर विमानातून प्रवास करत होते. जोपर्यंत आपण प्रत्येक पैलूच्या खोलात जात नाही तोपर्यंत आपल्याला सत्य कळणार नाही. पण कोणीतरी या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही उपस्थित केलेल्या शंका चौकशी अहवालात खऱ्या ठरल्या आहेत. एएआयबीच्या अहवालात बारामतीचा जिल्हा म्हणून उल्लेख करण्यासह विसंगती आहेत. चौकशी किती गांभीर्याने झाली आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ajit pawar and rohit pawar तसेच, अहवालात म्हटले आहे की विमान झाडांना धडकले आणि नंतर पडले. परंतु त्या ठिकाणी कुठेही झाडे नाहीत. फक्त एक लहान झुडुप आहे ज्याला विमानाने स्पर्शही केला नाही. झाडांना धडक दिल्याबद्दल अहवालात जे म्हटले आहे ते चुकीचे आहे. व्हीएसआरकडून अशा अनेक गंभीर चुका झाल्या आहेत, असे ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी दोन दिवसांत हाती घेतली, तर बारामती अपघाताला एक महिना उलटूनही अशीच कारवाई झाली नाही. व्हीएसआर व्हेंचर्सचे दोन संचालक आणि तीन भागधारक होते आणि दोन संबंधित कंपन्यांमध्ये आठ सामान्य नावे होती. व्हीएसआरचा मालक केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी संबंधित होता आणि दिल्लीत नोंदणीकृत असूनही कंपनीने ज्युबिली हिल्स (हैदराबादमधील उच्चभ्रू क्षेत्र) मध्ये बाजारभावापेक्षा १७ कोटी रुपयांपेक्षा जास्त दराने उच्च मूल्याची गुंतवणूक का केली, असा प्रश्न उपस्थित केला. २०१७ च्या नियमांनुसार एएआयबीच्या कायदेशीर आणि संस्थात्मक चौकटीबद्दलही चिंता व्यक्त केली. ही संस्था वैधानिक किंवा स्वायत्त संस्था नाही आणि डीजीसीएशी संलग्न असण्याव्यतिरिक्त सचिव आणि मंत्र्यांना जबाबदार आहे असा दावा करत, कोणतीही स्वतंत्र तपास संस्था नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. पवार पुढे म्हणाले, व्हीएसआर या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कधी काय होईल, कधी काय केले जाईल हे कोणाला सांगता येत नाही. कोविडच्या काळात प्रायव्हेट जेटचे तिकीट विकून पेशंट्सकडून भरमसाठ पैसे उकळल्यामुळे युएई मध्ये व्हीएसआरला सहा महिन्यांसाठी बॅन केले होते, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतही या कंपनीने असा हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून गोष्टी केल्या अस आमचं मत असल्याचे ते म्हणाले. …तर शिंदेंचे विमान पाडले असते (Rohit Pawar) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस भेटीशी संबंधित एका घटनेचा उल्लेख करून त्यांनी व्हीएसआर व्हेंचर्सने अनेक वेळा बेजबाबदारपणा दाखवला असल्याचा आरोप केला. रोहित पवार यांच्या माहितीनुसार, 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान शिंदे हे दावोसला गेले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासात फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो आणि इतर देशांची परवानगी घ्यावी लागते. बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेले तर ते विमान पाडलेही जाऊ शकते आणि तसेच काहीतरी हे शिंदे साहेबांच्या बाबतीत घडले. विमानात इंधन भरल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराणच्या हद्दीतून गेले. इराणने सांगितले होते तुम्ही जर आत्ताच्या आता माघारी नाही वळला तर तुमचे विमान आम्ही पाडू. त्यावेळी या विमानात स्वतः एकनाथ शिंदे आणि इतर काही अधिकारी बसले होते. इराणने हटकल्यानंतर विमान इराकच्या बाजूला गेले. शेवटी कोणतीही परवानगी नसल्याने ते परत आणले गेले आणि सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला गेले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतही या कंपनीने असा हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून गोष्टी केल्या, असे आमचे मत असल्याचे पवार म्हणाले.