Suryakant More | अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहीत पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे सभापती विधान परिषद सदस्य आणि सभापती राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात आक्षेपार्ह टीका केली. याप्रकरणी सूर्यकांत मोरेविरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांच्याकडून विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. विधानपरिषदेला मोठी गौरवशाली परंपरा लाभली आहे. त्या सर्वांचा मोरे यांनी अपमान केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमात रोहित पवार उपस्थित असल्याने त्यांची जबाबदारीही तेवढीच आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ही दरेकर यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाकडून हक्कभंग दाखल झाल्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा की नाही हे ठरवावे, असे म्हंटले. Suryakant More | शिवसेनेचे अनिल परब यांनी या प्रस्तावाचे अनुमोदन केले. हा राजकीय भांडणाचा नव्हे तर विधानपरिषदेच्या अस्मितेचा मुद्दा आहे. या सभागृहाची व येथील ‘लाल कार्पेट’ची ताकद काय आहे हे दाखविण्याची वेळ आली आहे असे परब म्हणाले. काय म्हणाले सूर्यकांत मोरे? 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे एकूण कामकाज, रचना, सदस्य यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. विधानपरिषदेतील कार्पेटचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतिक आहे व आमदारांच्या लाल बिल्ल्याला कुणी विचारत नाही. सभापती कायदे बनवत नाहीत, असे देखील मोरे यांनी म्हटले होते. तसेच सभापतींबाबत देखील आक्षेपार्ह वक्तव्य करत ते कायदेपंडित आहेत का? असा सवाल केला होता. हेही वाचा : “आज मी जिवंत आहे कारण….”; रेखाच्या शब्दांनी उपस्थितांची मनं जिंकली, सौदी अरेबियातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल