शिंदेंच्या आमदाराकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम; आशिष शेलार म्हणाले “…हे भाजपला मान्य नाही”

Ashish Shelar | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी भायखळ्यात मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केले होते. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपनेही आक्षेप घेतला आहे.
आशिष शेलार यांनी बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नसल्याचे म्हंटले आहे. “मला या विषयी पूर्ण माहिती नाही तरीपण अशा पद्धतीच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नाही. त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं हे मान्य नाही,” असे आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटले आहे.
यामिनी जाधव काय म्हणाल्या?
दरम्यान, यामिनी जाधव यांनी ७ सप्टेंबर रोजी आपल्या मतदारसंघात १००० बुरखा वाटले होते. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. याबाबत यामिनी जाधव म्हणाल्या की, “माझ्या मतदारसंघात जवळपास ५० टक्के मुस्लीम समाज राहतो. दिवाळीला आम्ही हिंदूंना भेटवस्तू वाटतो, पण मुस्लीम समाजासाठीही काहीतरी करावे, या कल्पनेतून बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. याबाबत आमच्या मित्रपक्षांचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो, पण आम्हाला आमच्या मतदारसंघाची काळजी घ्यावी लागेल,” असेही त्या म्हणाल्या. Ashish Shelar |
लोकसभा निवडणुकीत पराभव
लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा ५२ हजार मतांनी पराभव केला. भायखळा विधानसभा मतदार संघातून अरविंद सावंत यांना सर्वाधिक मतं मिळाली होती. Ashish Shelar |
हेही वाचा:





