Box office : बंपर ओपनिंग! पहिल्याच दिवशी आवारापन 2 ने सनी देओलच्या Batwara 1947 ला टाकले मागे; पाहा कलेक्शनचे आकडे
Box office : अॅक्शन थ्रिलर चित्रपट आवारापन २ ने सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्या पार्टीशन १९४७ या चित्रपटाला कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे.

Box office : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ अॅागस्ट या दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांना पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून, इम्रान हाश्मीच्या आवारापन २ ने पहिल्याच दिवशी बाजी मारली आहे.
या चित्रपटाला दमदार ओपनिंग मिळाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या आवारापनचा कलेक्शनचा विक्रम दुसऱ्या भागाने पहिल्याच दिवशी मोडला आहे.
अॅक्शन थ्रिलर चित्रपट आवारापन २ ने सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्या पार्टीशन १९४७ या चित्रपटाला कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे.
ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कनुसार, ‘आवारापन २’ ने पहिल्याच दिवशी तब्बल २१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.
नितीन कक्कर दिग्दर्शित आणि विशेष भट्ट निर्मित ‘आवारापन २’ या चित्रपटाद्वारे इम्रान हाश्मी त्याच्या अविस्मरणीय शिवम पंडित या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या चित्रपटात शबाना आझमी, दिशा पटानी आणि सुविंदर विकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला ‘आवारापन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्याने केवळ ७.७६ कोटी रुपयांची कमाई केली होती. इम्रान हाश्मीचा ‘आवारापन २’ बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘पार्टिशन १९४७’ सोबत टक्कर देत आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
सनी देओलच्या पडद्यावरील दमदार अभिनयाचे आणि त्याच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत असले तरी, पहिल्या दिवसाची कमाई मात्र खूपच कमी झाली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पार्टीशन १९४७ चित्रपटाने देशभरातील ८,७२१ शोजमधून पहिल्याच दिवशी ५.७५ कोटी कमावले आहेत. भारतातील एकूण कमाई ६.८४ कोटी झाली आहे. यामुळे बॅाक्स अॅाफिसवर पहिल्या दिवशी आवारापन २ हा चित्रपट वरचढ ठरला आहे. आता येत्या दोन दिवसांत आवारापन २ चित्रपट किती कमाई करतो आणि पार्टीशन १९४७ हा चित्रपट प्रेक्षक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





