purangabbi : ‘आवारापन 2’मधील हा खलनायक कोण? दमदार भूमिकेने वेधले लक्ष
purangabbi : त्याचबरोबर पुरण गब्बीच्या अभिनयाचीही सर्वत्र प्रशंसा होत असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

purangabbi : इम्रान हाश्मीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आवारापन २’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाची कथा, अॅक्शन आणि कलाकारांच्या अभिनयासह एका नव्या चेहऱ्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
हा चेहरा म्हणजे पुरणगब्बी. चित्रपटात त्याने साकारलेला निर्दयी खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून इम्रान हाश्मीच्या पात्राला तो तगडी टक्कर देताना दिसत आहे. त्यामुळे हा पुरणगब्बी नेमका कोण आहे याविषयी चर्चा रंगली आहे.
अनेकांना माहिती नसेल पण पुरण हा अभिनेत्री वामिका गब्बीचा धाकटा भाऊ आहे. अभिनय क्षेत्रात तो नवीन नसून यापूर्वीही त्याने विविध चित्रपट आणि वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र, आवारापन २ चित्रपटात त्याने साकारलेला जोरावर हा खलनायक विशेष भाऊ खाऊन गेला आहे. त्याचबरोबर पुरण गब्बीच्या अभिनयाचीही सर्वत्र प्रशंसा होत असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हा चित्रपट ठरू शकतो टर्निंग पाॅईट
पुरण गब्बीने शाहरुख खानच्या ‘झिरो’, आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमध्ये तसेच नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय ‘ब्लॅक वॉरंट’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र, ‘आवारापन २’ हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीला नवे वळण देणारा ठरू शकतो, अशी चर्चा सध्या सिनेसृष्टीत सुरू आहे.
View this post on Instagram
अभिनयासोबतच पुरण सोशल मीडियावरही सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे हजारो फॉलोअर्स असून त्याच्या पोस्ट आणि स्टायलिश लूकची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. त्याचा फॅशन सेन्स आणि वेगळ्या शैलीमुळे तो तरुणांमध्ये नेहमीच लोकप्रिय ठरत आहे.
‘आवारापन २’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’चा सिक्वेल आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटात इम्रान हाश्मी, शबाना आझमी, दिशा पटानी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या ‘पार्टिशन १९४७’शी होत असली तरी प्रेक्षकांकडून ‘आवारापन २’ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अंदाजानुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे २०.५० कोटी रुपयांची नेट कमाई करत दमदार सुरुवात केली आहे.




