Eknath Shinde : ‘गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर दिले जाईल, टोळीयुद्ध मुळासकट उखडून टाकू’; एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा
Eknath Shinde : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्य सरकार अत्यंत आक्रमक भूमिकेत आले आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. तसेच, मुंबईत टोळीयुद्ध सरकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Eknath Shinde)
रविवारी रात्री उशिरा शिंदेंनी टायगर श्रॉफच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला. या घटनेनंतर त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले. (Eknath Shinde)
टायगर श्रॉफ यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, १९९० च्या दशकात ज्या प्रकारे गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले होते, तशीच वेळ आता पुन्हा आली आहे. १९९० च्या दशकात जेव्हा टोळीयुद्धे फोफावली होती, तेव्हा त्यांची मुळे उखडून टाकण्यात आली होती. (Eknath Shinde)
आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्यांना मुळासकट उखडून टाकण्याची वेळ आली आहे. सेलिब्रिटींना घाबरवण्याचे प्रयत्न किंवा मुंबई अथवा महाराष्ट्रात गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचे प्रकार सरकार अजिबात खपवून घेणार नाही, असे ते म्हणाले. शिंदे यांनी या हल्ल्याला दुर्दैवी घटना म्हटले आणि टायगर श्रॉफ सुखरूप असल्याचे सांगितले. (Eknath Shinde)
त्यांनी सांगितले की, पोलीस या गोळीबार प्रकरणाचा सखोल तपास करतील, दोषींची ओळख पटवतील आणि अशा हल्ल्यांमागे असलेल्या गुन्हेगारी जाळ्यांचा पूर्णपणे खात्मा करतील. नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. सेलिब्रिटींना मुद्दाम धमकावले का जात आहे? पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Eknath Shinde)




