Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; राजस्थानमधून तिघांना अटक
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या प्राणघातक गोळीबाराच्या प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे.

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात राजस्थानमधून तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. (Tiger Shroff)
रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात दोन बंदूकधाऱ्यांनी टायगर श्रॉफवर गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने, अभिनेता या घटनेत सुरक्षित बचावला.
सांगली येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, गोळीबार केल्यानंतर आरोपी सुरतच्या दिशेने पळाले आणि त्यानंतर जयपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. (Tiger Shroff)
मुंबई पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना कोटा रेल्वे स्थानकावर पकडले. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबईत आणले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Tiger Shroff)
मुंबई पोलिसांचे कौतुक करत फडणवीस म्हणाले, पोलिसांनी अत्यंत तत्परतेने काम केले आहे. मी म्हटल्याप्रमाणे, या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचेपर्यंत मुंबई पोलीस शांत बसणार नाहीत. या गोळीबारामागचा हेतू शोधून काढण्यासाठी आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतरांना ओळखण्यासाठी सखोल तपास केला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही, असा ठाम निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (Tiger Shroff)
आरोपी अनिल पंडितच्या संपर्कात
राजस्थान पोलिसांनी सांगितले की, या गोळीबारात सहभागी असलेल्या तिघांना (ज्यामध्ये एका अल्पवयीन व्यक्तीचाही समावेश आहे) कोटा शहरात पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. (Tiger Shroff)
कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, आरोपींपैकी एक जण अनिल पंडित याच्या संपर्कात होता. अनिल पंडित हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा साथीदार असल्याचे मानले जाते. याच टोळीने रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वीकारली होती. (Tiger Shroff)
कोटा शहर पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सुमारे १५ मिनिटे चाललेल्या एका मोहिमेत या तीन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांचा नेपाळला पळून जाण्याचा बेत होता. आरोपींपैकी दोघांची ओळख बिहारमधील बेगुसराय येथील रितिक ऊर्फ रोशन आणि हरियाणातील सोनीपत येथील रेहान अशी पटली आहे. तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. (Tiger Shroff)

