इमारती कोसळल्या, आजूबाजूला ढिगारा…; तिबेटमध्ये भूकंपामुळे विध्वंस, 53 जणांचा मृत्यू

Earthquake | आज सकाळी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. सुमारे 7.1 तीव्रतेच्या या भूकंपामुळे तिबेटमध्ये आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जण जखमी झाले आहेत.
या भूकंपाचे झटके नेपाळ, भारत आणि बांगलादेश पर्यंत जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, नेपाळपासून सुमारे 93 किमी ईशान्येस तिबेटमधील लोबुचे हे भूकंपाचा केंद्र असल्याचे समोर आले. नागरिक झोपेत असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे भीतीचे वातावरण होते. Earthquake |
घरांमध्ये लोक अडकले
आतापर्यंत या भूकंपात 53 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या येथे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
भूकंपामुळे तिबेटमध्ये मालमत्तेची मोठी हानी
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे तिबेटमध्ये मालमत्तेची मोठी हानी झाली आहे, इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत या भूकंपामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाचे धक्के भारतमधील बिहार, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही जाणवले. त्याशिवाय नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या अनेक भागातही भूकंपाचे हादरे जाणवले. Earthquake |
नेपाळमध्ये सकाळी 6.50 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे भूकंप निरीक्षण संस्थेने सांगितले आहे. नेपाळच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे केंद्र चीनचे डिंघी होते. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे लोक प्रचंड घाबरले आहेत. मात्र, आतापर्यंत या भूकंपामुळे देशात कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. Earthquake |
10 किलोमीटर खोलीवर केंद्र
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे ने नेपाळ सीमेजवळील तिबेट भागात मंगळवारी ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू डोंगराळ भागात सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. त्याचवेळी चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने भूकंपाची तीव्रता 6.8 नोंदवली आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये 2015 मध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप आला होता. ज्यात तब्बल 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि 22 हजारहून जास्त लोक जखमी झाले होते. यात पाच लाखांहून अधिक जणांना नुकसान सहन करावं लागलं होतं.
हेही वाचा:





