गोव्यात समुद्रकिनारी ब्रिटिश महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

पणजी : गोव्यात एका बिटिश महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर गोव्यातील आरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळील प्रसिद्ध ‘स्वीट लेक’ येथे ब्रिटिश महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सोमवारी एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी जोएल व्हिन्सेंट डिसोझा याने 2 जून रोजी समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेत असलेल्या एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला.
पतीसोबत गोव्यात फिरायला आलेल्या पीडित महिलेने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस अधिकारी म्हणाले, “आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.” गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर बलात्काराची ही पहिली घटना नाही. याआधी गोव्यात 2018 मध्येही ब्रिटीश महिलेवर बलात्काराचे प्रकरण समोर आले होते.





