US Iran war : इराणमधील पूल आणि टॉवर अमेरिकेकडून उद्ध्वस्त; सामुद्रधुनी खुली करण्यासाठी पुन्हा दबाव
होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणवर दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा ट्रम्प यांनी इशारा दिला होता.

US Iran war : अमेरिकेने आज पहाटेच्या सुमारास इराणमधील होर्मोझगान प्रांतातील पूल आणि टॉवर उद्ध्वस्त केले. होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणवर दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा ट्रम्प यांनी इशारा दिला होता. त्यानुसार हे हल्ले करण्यात आले. अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या कतारसह इतर मित्र देशांवर हल्ले केले. (US Iran war)
दोन्ही बाजूंमधील हंगामी युद्धविराम करार संपुष्टात आला आहे आणि आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले करायला सुरुवात केली आहे. इराणवर शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात डझनभर लोक ठार झाले आहेत आणि शेकडो जखमी झाले आहेत, असे इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे युद्ध पुन्हा व्यवस्थित चालू झाले असल्याचे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नागरिकांना उद्देशून टिव्हीवरून केलेल्या संबोधनात म्हटले आहे. (US Iran war)
होर्मोझगान प्रांतातील पूलांवर अमेरिकेने रात्रीच्यावेळी मारा केला. या हल्ल्यात किमान सात जण ठार झाले. होर्मूझच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या बांदेर खामिर शहरात देखील अमेरिकेचे हल्ले झाले. इराणमधील महत्वाचे बंद असलेल्या बंदर अब्बासशी राजधानी तेहरानचा असलेला संपर्क तोडून टाकण्याच्या उद्देशाने रस्ते आणि रेल्वेच्या पुलांना देखील लक्ष्य करण्यात आले. (US Iran war)
बंदर अब्बासला जोडणारे इतर मार्ग खुले असले तरी त्या मार्गांवरही अमेरिकेकडून हल्ले केले जाऊ शकतात. त्यामुळे लष्करी आणि जनतेसाठी आवश्यक असलेली मालवाहतूक खंडीत होण्याचा धोका आहे. ताज्या हल्ल्यांमध्ये डझनभर ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे. (US Iran war)
या हल्ल्यांनी ओमानच्या आखातातील आणि अफगाणिस्तानला रस्ते मार्गाने जोडणाऱ्या चाबहार बंदरातील टॉवर उद्ध्वस्त झाले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी सोशल मीडियावर या भागातील उद्ध्वस्त टॉवरचे फोटो शेअर केले आहेत. (US Iran war)
इराणकडून कतारवर हल्ले ! (US Iran war)
शुक्रवारी कतारमधील नागरिकांना दोनवेळा सुरक्षित आश्रय घेण्याचे अलर्ट देण्यात आले. कतारच्या अवकाशामध्ये इराणच्या क्षेपणास्६ंना रोखण्यासाठी कतारने डागलेल्या क्षेपणास्त्रांच्या स्फोटांचे आवाज घुमले. या क्षेपणास्त्रांचे अवशेष पडल्यामुळे एक लहान मुलगा जखमी झाल्याचे कतारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानबरोबर मिळून कतार इराण आणि अमेरिकेमधील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करत आहे. इराणने बहरीन आणि कुवेतवरही हल्ले केले. इराणने डागलेली तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रे हवेतच रोखल्याचा दावा जॉर्डनने केला आहे. इर्लिब आणि सुलायमानियाह या उत्तर इराणमधील कुर्दिश वसाहतीत देखील स्फोट झाल्याचे आवाज ऐकायला आले. मात्र यामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
होर्मूझमध्ये आणखी एका टँकरवर हल्ला !
होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये ओमानच्या किनाऱ्याजवळ आणखी एका टँकरवर हल्ला झाल्याचा दावा ब्रिटीश लष्कराने सांगितले. इराणच्या हल्ल्यामुळे या जहाजाचे किरकोळ नुकसान झाले आणि जहाजावरील कोणीही क४मचारी जखमी झाला नाही, असे युनाटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्सने म्हटले आहे.
ओमानजवळच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या टँकरवर इराण हल्ले करत आहे, परंतु त्यांनी तात्काळ कोणताही हल्ला झाल्याचे मान्य केले नाही. महिन्याच्या सुरुवातीला, सामुद्रधुनीतून होणाऱ्या साप्ताहिक मालवाहतुकीत जवळपास एक चतुर्थांशने घट झाली आहे.
होर्मूझची सामुद्रधुनी इराणशिवाय इतरांसाठी खुली असून जहाजांनी या मार्गाने प्रवास करावा, असे अमेरिककडून आवाहन केले जात असले, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव जहाजे आता हा धोकादायक प्रवास टाळू लागली आहेत.






