Breaking News : पुलवामा कॅम्पमध्ये जवानाची आत्महत्त्या
Updated On:

पुलवामा – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कॅम्पमध्ये सीआरपीएफचा एक जवान मृतावस्थेत आढळून आला आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे समजते.
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील चुरसू येथे पहाटे 4 वाजताच्या सुमारास कॉन्स्टेबल अजय कुमार मृतावस्थेत आढळून आला.
त्यापूर्वी गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या जवानाने आत्महत्या केली असावी, असा तपास पथकाचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे.





