बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी; एक पोलीस अधिकारी जखमी

Badlapur School Girl Case । Akshay Shinde : बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांकडून करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने एसआयटीमार्फत सुरु केली. या चौकशीदरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेविरोधात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा सापडला.
शाळेच्या गेटच्या बाहेरच्या सीसीटीव्हीत अक्षय शिंदे शाळेत जाताना आणि येताना आढळून आला होता. घटनेच्या महिन्याभर आधीपासून शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद होते. सीसीटीव्ही बंद असल्याने तांत्रिक पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. मात्र अक्षय विरुद्ध तांत्रिक पुरावा हाती लागला आणि अक्षय शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
मात्र, अश्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस अधिकारी ही जखमी झाले आहे. अक्षय शिंदे हा गंभीर असल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. सध्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. तळोजा कारागृहातून पोलीस त्याला बदलापूरला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे.
दोन चिमुकलींना ओरबाडणारा नराधम ‘अक्षय शिंदे’ नेमका कोण?
Badlapur School Girl Case: दोन चिमुकलींना ओरबाडणारा नराधम ‘अक्षय शिंदे’ नेमका कोण? पाहा…





