Bramati News : असंस्कृत शिकाऊ वैमानिकांना आवरा.! प्रशिक्षण संस्था ‘रासपा’च्या रडारवर

बारामती : शहर आणि परिसरात शिकाऊ वैमानिकांची रेड बर्ड फ्लांईग अॅकॅडमी कार्यरत आहे. सदर अॅकॅडमीचे शिकाऊ वैमानिकांमुळे बारामतीची संस्कृती बिघडत चाललेली आहे, हे शिकाऊ वैमानिक शाळा व महाविद्यालय परिसरात रहातात. हे वैमानिक खुले आम सिगारेट पितात, मद्य प्राषाण करून मोटार सायकली, अथवा चार चाकी भरधाव वेगात रोडवरून चालवीतात.
यांच्यामुळे लोकांना जीव मुठीत धरूण चालावा लागत आहे. वर्दळीच्या ठिकाणी सिगारेट पीत असल्यामुळे शाळकरी व महाविद्यालयातील मुले व मुलींवर परिणाम होत आहे. बारामतीची संस्कृती बिघडण्याचे काम या अॅकॅडमीच्या शिकाऊ वैमनिकांमुळे होत आहे. असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाची तालुकाध्यक्ष ॲड. अमोल सातकर यांनी केला आहे.
कसल्याही प्रकारचा निबंर्ध नसल्याने हे शिकाऊ विमान चालक ह खुले आम बाजारपेठेत त्यांच्या मनाला वाटेल तसे वागतात, सदरच्या अॅकॅडमीपासून मोठया प्रमणावरती प्रशासनाला, महसुल मिळत नाही या उलट बारामतीची संस्कृती बिघडताना दिसत आहे.
पाठीमागच्या महिन्यात या अॅकॅडमीचे जवळ जवळ तीन ते चार शिकाऊ वैमानिक रोड अपघातात मरण पावले आहेत, सदरची अॅकॅडमी त्वरीत बंद करावी. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड अमोल गुलाबराव सातकर यांनी दिला, व उपविभागीय अधिकारी बारामती यांना निवेदन दिले या वेळी शाम घाडगे, किशोर सातकर आकाश सवाने व स्वप्नील जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





