कडक बंदोबस्तात घेतली ‘BPSC’ परीक्षा; तब्बल ‘इतक्या’ हजार विद्यार्थ्यांनी दिली फेरपरीक्षा

BPSC Exam – बिहारची राजधानी पाटणामध्ये एकीकडे बीपीएससी परीक्षेबाबत विद्यार्थी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे आज पुन्हा परीक्षा घेण्यात आली. बिहार लोकसेवा आयोग म्हणजे बीपीएससीकडून आज 4 जानेवारी रोजी पाटणा येथील 22 केंद्रांवर परीक्षा घेतली गेली.
या परीक्षेला सुमारे 12000 उमेदवार बसले होते. मात्र, मागच्या वेळी ज्यांच्या केंद्रांवर अनियमितता होती अशा उमेदवारांसाठीच ही परीक्षा घेतली गेली. त्याचबरोबर परीक्षा रद्द करून संपूर्ण बिहारमध्ये पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत, ती मान्य करण्यात आलेली नाही.
बीपीएससी परीक्षेसंदर्भात पाटण्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. या संदर्भात परीक्षा केंद्राजवळ कलम 163 लागू करण्यात आले. परीक्षा केंद्रांजवळ कलम १६३ लागू राहणार आहे. कलम 163 अन्वये, परीक्षा केंद्रांच्या 100 मीटरच्या आत पाचपेक्षा जास्त लोकांच्या सार्वजनिक एकत्र येण्यास मनाई आहे.
याशिवाय निदर्शने, मिरवणुका आणि परवानगीशिवाय लाऊडस्पीकरचा वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली. उमेदवार आणि त्यांच्या साथीदारांना मोबाइल फोन किंवा स्मार्ट उपकरणे बाळगण्याची परवानगी दिली नव्हती, तथापि पोलीस अधिकारी आणि परीक्षा कर्मचारी यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
पाटणा येथील एका परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर बीपीएससीने तेथील १२ हजार उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेतली आहे. मात्र, यावेळी या उमेदवारांसाठी 22 केंद्रे करण्यात आली. यापैकी 15 परीक्षा केंद्रे पाटणा सदर उपविभागांतर्गत येतात. बीपीएससी परीक्षेला विरोध होत असताना ही परीक्षा घेतली गेली.
हजारो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी पाटण्यात रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत केली, तर अनेक विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर निदर्शने वाढली आणि अनेक आंदोलक जखमी झाले.





